
अॅड. एस. के. इगावे शॉप नंबर ५ गुलमोहर प्लाझा, पुष्कर कार्यालयासमोर,
विसावा नाका, गोडोली, सातारा, मोबाईल नं.९८२२९५९७०२ आमचे अशिलांनी दिलेल्या माहिती व सूचना तसेच अधिकारावरून या प्रस्तुत जाहीर नोटीसद्वारे, तमाम जनतेस विशेषतः माळशिरस तालुका तसेच मौजे पिरळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर हद्दीतील तसेच जवळपासच्या तसेच सोलापूर जिल्हयातील समस्त लोकांना कळविण्यात येते ते खालीलप्रमाणेमाळशिरस येथील दुय्यम निबंधक सो, यांचे कार्यक्षेत्रातील व मौजे पिरळे, ता. माळशिरस जि. सोलापूर हद्दीतील गट नंबर ३१२ क्षेत्र ७ हे. ३३ आर. याचा आकार ५ रु.०० पे. यामधील पोटखराब ० हे. १२ आर. या एकूण क्षेत्रामधील गट नंबर ३१२ पैकी पुर्वेचे क्षेत्र ३ हे. ९९ आर. इतके क्षेत्र याचा आकार २ रु. ७० पै. यामधील पोटखराब ० है. १२ आर. याच्या चतुसिमा पुर्वेस- गट नंबर ३१३/१ ते ३१२/३, पश्चिमेस- गट नंबर ३१२ मधील विहीर, दक्षिणेस- गट नंबर ३०८ ते ३१०, उत्तरेस- गट नंबर २९८ अशी चर्तुःसीमापुर्वक शेतजमिनमिळकत आमचे अशील यांनी दि. ७/३/१९९० रोजी रक्कम रु.९५,०००/- या रक्कमेस श्री. माधवराव न पाटील, रा. कळंबोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचेकडून स्वकष्टार्जित उत्पन्नातून वैयक्तिकरित्या खरेदी केलेली होती व आहे. सदर मिळकत खरेदी केल्यापासून आमचे अशील हे सदर चर्तुसिमापुर्वक मिळकतीमध्ये मालकीहक्काने कब्जेवहिवाट करीत आहेत. व त्याचप्रमाणे सदर चर्तुसिमापूर्वक मिळकतीमध्ये आमचे अशीलांचे राहते शेतघर असून त्याठिकाणी आमचे अशील कायमस्वरुपी पुर्वीपासून आपल्या कुटूंबासोबत राहूनच सदर शेतामध्ये पिक- पाणी करून आपल्या कुटूंबाची उपजिविका करित असतात. अशारितीने उपरोक्त नमूद क्षेत्राच्या मिळकतीवर आमचे अशिल यांचाच मालकीहक्क व कब्जेवहिवाट व ताबा आजमितीसही चालू आहे. त्यामूळे सदर उपरोक्त नमूद चतुःसीमापूर्वक मिळकत त्यांचा मालकीहक्क तसेच वहिवाटीचा हक्क व त्याचा ताबा व त्यामधील सर्व सुख सुविधासह येणेप्रमाणे मिळकत ही या जाहीर नोटीसीचा मुख्य विषय असून त्यास या नोटीसीमध्ये सोयीकरिता "सदर मिळकत" असा उल्लेख करण्यात येत आहे. उपरोक्त नमूद असलेल्या सदर मिळकतीच्या अनुषंगाने आमचे अशिलांचे छोटे भाऊ श्री. रमेश चोखा कांबळे, रा. पिंगळी बुद्रुक, ता. माण, जि. सातारा हे जाणिवपूर्वक व हेतूपुरस्कर सदर शेतजमिन मिळकतीबाबतची पूर्यापासूची आमची अशिलांची असलेली वास्तविक्ता व वस्तूस्थिती लपवून बेकायदेशीररित्या, अनाधिकृतपणे सदर शेतजमिनबाबत हस्तांतरणाच्या अनुषंगाने खरेदी विक्रीचा दस्त अस्तित्वात आणुन त्रयस्थ इसमाचा हक्क प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने माळशिरस भागामध्ये वाच्यता व भाषा करु लागलेल्या आहेत. त्यामुळे आमचे अशिल यांनी त्यांचे भाऊ श्री. रमेश चोखा कांबळे यांच्या विरुद्ध माळशिरस न्यायालयामध्ये रे.दि.मु.नं. ९७/२०२२ हा दावा दाखल केलेला आहे. त्यामुळे सदर शेतजमिन मिळकतीबाबत दिवाणी बाब न्यायप्रविष्ट आहे. तसेच सदर मिळकतीमध्ये पूर्वीपासून आमच्या अशिलांची मालकी व कब्जेहक्काने वहिवाट व ताबा कायम आहे. व त्यामुळे सदर मिळकतीच्या अनुषंगाने कोणीही कसलाही व्यवहार केल्यास मालकीचा तसेच कब्जाचा व कब्जेवहिवाटीचा व तसेच ताब्याचा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित होणार असून संबंधिताची श्री. रमेश कांबळे यांच्या मार्फत फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक आमचे अशिल यांना सदर मिळकतीचा कोणताही प्रकारचा व्यवहार करावयाचा नसून अन्य त्रयस्त इसमास हस्तांतरीत करवयाची नाही. व तशी त्यांची इच्छा ही नाही. सबब श्री. रमेश चोखा कांबळे या व्यक्तीशी सदर शेतजमिन मिळकतीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा व कोणत्याही स्वरूपाचा गहाण, दान, बक्षीस, लिज तसेच विकसन करार, खरेदी-विक्री तसेच खुष-खरेदीचा व्यवहार करू नये. व त्यास आमचे अशिलांची सक्त हरकत असून असा व्यवहार आमचे अशिलांवर व सदर मिळकतीवर कोणताही प्रकारचे बंधनकारक असणार नाही. अन्यता संबंधितावर आमच्या अशिलांना जो आवश्यक सल्ला मिळेल त्याप्रमाणे सक्त फौजदारी अथवा दिवाणी तसेच आवश्यकती, कडक कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल याची गांभीयनि नोंद घ्यावी. सदर मिळकतीमध्ये आमचे अशिलांची प्रत्यक्ष मालकी व कब्जेवहिवाट असून आमच्या अशिलांचा पूर्वीपासून ताबा आहे. तसेच सदर मिळकतीच्या अनुशंगाने न्यायालयीन बाब प्रलंबित असल्याने संबंधित कोणीही सदर शेतजमिन मिळकतीच्या अनुशंगाने कोणत्याही प्रकारचा व कसल्याही प्रकारचा व कसल्याही स्वरुपाचा खूपखरेदीचा अथवा हस्तांतरणाचा व्यवहार करू नये. तसेच आमचे अशिलांचे सदर शेतजमिन मिळकतीमध्ये असणारी मालकी तसेच असणारी कब्जेवहिवाट मुळीच हस्तांतरीत होणार नसून सदर मिळकतीमध्ये आमचे अशिलांचा असणारा मालकी हक्क व कब्जा अथवा ताबा संबंधितांना प्रत्यक्षरित्या मुळीच मिळू शकणार नाही, याची सक्तपणे गांभीर्याने नोंद घ्यावे. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. सदर जाहिर नोटीशीची माहितीकरिता प्रत - संबंधित दुय्यम निबंधक सो. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना रजिस्टर पोस्टामार्फत पाठविण्यात आलेली आहे. माळशिरस, दिनांक : ५/२/२०२२ अशिल - श्री. सयाजीराव चोखा कावळे
अशिलातर्फे अॅडव्होकेट





Adv. S. K. Igave Shop No. 5 Gulmohar Plaza, Opposite Pushkar Office,
Visava Naka, Godoli, Satara, Mobile no. Malshiras, Dist. All the people in and around Solapur district as well as in Solapur district are informed as follows: Malshiras Dist. Group No. 312 in Solapur boundary area 7 ha. 33 r. Its size is Rs. The stomach is bad. 12 r. Out of this total area, out of group number 312, East area is 3. 99 r. The size of this area is Rs. 70p. The stomach is bad. 12 r. Its four boundaries are East - Group No. 313/1 to 312/3, West - Well in Group No. 312, South - Group No. 308 to 310, North - Group No. 298. On 7/3/1990, the amount was Rs. 95,000 / -. Madhavrao Na Patil, Ra. Kalamboli, Tal. Malshiras, Dist. It was and is personally purchased from Solapur out of self-earned income. Since the purchase of this property, our Ashils have been occupying this property for the last four decades. In the same way, in this quarterly income, our Ashils live in a farm, where our Ashils have been living permanently with their family for a long time and have been making a living by cultivating crops in this field. In this way, the ownership and possession of the property of the above mentioned area is still with us today. Therefore, the said property is the main subject of this public notice as per the above mentioned quaternary property as well as their right of ownership and possession and possession and all the comforts in it and it is referred to as "this property" for convenience In connection with the above mentioned income, our younger brother Shri. Ramesh Chokha Kamble, Ra. Pingali Budruk, Tal. Maan, Dist. Satara has deliberately and deliberately sought to establish the right of third party Isma to establish the right of third party Isma by illegally and unauthorized transfer of the said agricultural land by concealing the fact and reality of our vulgarity regarding the acquisition of this agricultural land. Therefore, our Ashil asked his brother Shri. Against Ramesh Chokha Kamble in Malshiras Court 97/2022 has been filed. Therefore, the civil matter regarding this agricultural land income is justifiable. Also, in this property, the ownership and possession of our property has already been maintained. Therefore, if anyone makes any transaction in connection with the said property, there will be a big serious question of ownership, possession and possession as well as possession. There is a strong possibility of fraud through Ramesh Kamble. In fact, we don't want Ashil to do any transaction of this income and transfer it to another third party. And that's not what they want. Because Mr. Ramesh Chokha Kamble should not be treated with any kind of mortgage, donation, reward, lease as well as development agreement, purchase and sale as well as happy purchase in connection with this agricultural land income. And we have a strong objection to that, and such a transaction will not be binding on us and our property. It is important to note that our clients will be required to take strict criminal or civil action as well as necessary, strict legal action, as required by the law. In this property we have direct ownership and possession of Ashila and our Ashila is already in possession. Also, as a court case is pending in connection with the said property, no one concerned should make any purchase or transfer of any kind and any kind of any kind and any kind of any kind in connection with the said agricultural land. It should also be seriously noted that the ownership and possession of our property in this property will not be transferred at all and the ownership and possession or possession of our property in this property will not be available to the persons concerned at all. It was a public notice. Copy of this public notice for information - Relevant Secondary Registrar So. Malshiras, Tal. Malshiras, Dist. Solapur has been sent by register post. Malshiras, Date: 5/2/2022 Ashil - Shri. Sayajirao Chokha crows
Advocate on behalf of Ashila